Ad will apear here
Next
‘समितीमुळे आयुष्याला दिशा मिळाली’
विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलताना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम.पुणे : ‘गावाकडून पुण्यात आल्यानंतर शहराची ओळख झाली, शिक्षणाच्या विविध वाटा सापडत गेल्या. जगण्याला शिस्त लागली. जीवनातील शाश्वत मूल्ये अंगीकारता आली. विद्यार्थी सहायक समितीतून मिळालेल्या संस्कारामुळे आयुष्याला दिशा मिळाली,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि विद्यार्थी सहायक समितीचे माजी विद्यार्थी डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.

विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, ‘समितीतल्या अनेक सवयी आजही पाळतो. त्यांचा उपयोग होतो. जगण्याला शिस्त लागली. दिनक्रम शिस्तीमध्ये असावा. इथे असताना शेतीच्या कामात क्रिएटिव्ह आणि काम केल्याचे समाधान मिळाले. प्रत्येकाने आपल्या प्रगतीचा विचार करताना मूल्य सांभाळली पाहिजे. ती रुजवली पाहिजे. समाजाला पुढे नेण्यासाठी माझे काय योगदान आहे, याचा विचार व्हावा. नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी शिकून घ्याव्यात. स्वतःवर विश्वास ठेवावा.’

प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या भावी योजनांविषयी तुकाराम गायकवाड यांनी माहिती दिली. डॉ. प्रसाद आंबीकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RYXLBE
Similar Posts
‘विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, मानवतेची भावना अंगीकारावी’ पुणे : ‘आयुष्यात अनेकदा अडचणीचे प्रसंग येतील. त्यातून स्वतःला उभे करण्याचे धैर्य हवे. शेवटपर्यंत शिकत राहण्याची आस असावी आणि व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचे असले, तरी त्यात स्वयंशिस्त आणि मानवतेच्या भावनेतून काम केले, तर अधिक यशस्वी होता येते,’ असा सल्ला पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांना दिला
घोलप महाविद्यालयात रंगला ‘अॅक्मे फॅशन शो’ पुणे : सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘अॅक्मे फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. होळी आणि रंगपंचमी या सणांवर आधारित ‘शेड्स ऑफ सेलिब्रेशन’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी विविधरंगी पोशाख सादर केले.
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा औंध : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डेप्युटी रजिस्ट्रार एम. व्ही. रासवे, सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. मृदुला कर्णिक उपस्थित होत्या.
‘अध्यापकांनी उद्योगजगताच्या गरजा समजून घेणे गरजेचे’ पुणे  :  ‘व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या अध्यापकांनी उद्योगजगताच्या बदलत्या गरजा, झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान या बाबी स्वतः प्रत्यक्ष समजून घेऊन त्यानुसार आपापल्या अध्यापनशैलीत बदल करणे गरजेचे आहे’, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले. 

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language